स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णूनगर :-
डोंबिवली पश्चिम भागात तीस वर्षांपूर्वी वस्ती वाढू लागली आणि त्या भागात मराठी शाळेची गरज भासू लागली. त्या वेळी विष्णू नगर भागात विद्याप्रेमी नागरिक श्री. रा. मो. अंतुरकर यांच्या राहत्या घरी 1968 च्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिशू विकास मंदिर, या नावाने 3 विद्यार्थ्यां सह शाळा सुरू झाली. सौ. अंतुरकर ह्या मॉन्टेसरी ट्रेंड असल्याने त्या हे कार्य करीत होत्या. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री. मोकाशी यांनी हे काम पाहीले. 1970 मध्ये अंतुरकर यांची ही शाळा राष्ट्रीय शिक्षण संस्थेने सामावून घेतली. ..